सुरक्षित गर्भपात म्हणजे

२० आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात

१५ आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात

१२ आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात

२५ आठवड्यापर्यंत केलेला गर्भपात

कायदेशीर गर्भपातासाठी

नवर्याची सही आवश्यक असते

फक्त त्य गर्भपात करणाऱ्या स्रीची सहि आवश्यक असते

मुलगी अठरा वर्षापेक्षा लहान किंवा मतीमंद असेल तर पालकांची सही आवश्यक असते

घरातील कुटुंब प्रमुखाची सही आवश्यक असते.

सुरक्षित गर्भपात कसा करावा

प्रशिक्षित डॉक्टरांकडून केलेला गर्भपात

सरकार मान्य केंद्रात केलेला गर्भपात

आईच्या प्रकृतीस कोणताही धोका न होता केलेला गर्भपात

वैद्यांकडून करून घेतलेला गर्भपात

वरील सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती घेऊ प्रत्येक महिलेला हे माहिती असणे गरजेचे आहे.

सुरक्षित गर्भपात

भारतात २० आठवड्यांपर्यंत कायद्याने गर्भपात करता येतो. पण गरोदरपणात पहिल्या तीन महिन्यात, म्हणजेच १२ आठवड्यांच्या आत सरकारी मान्यताप्राप्त तज्ञ डॉक्टरांकडून करून घेतलेल्या गर्भपाताला सुरक्षित गर्भपात म्हणतात.

गर्भपाताचा कायदा

एखादया गरोदर बाईच्या घरातील माणसे तिचा गर्भ मुलाचा की मुलीचा हे तपासून मुलीचा गर्भ पडायचा विचार करत असतील तर तिला आणि तिच्या घरच्यांना सल्ला मिळणे आवश्यक आहे.

या कायदयानुसार गर्भपात करण्याबाबत काही गोष्टींचे बंधन सरकारने घातले आहे.

गर्भलिंग तपासणी करून गर्भ पाडणे हा कायदयाने गुन्हा आहे. गर्भपात मान्यताप्राप्त सरकारी केंद्रातच करणे बंधनकारक असते.

आईच्या आरोग्याला कोणताही अपय न करता २० आठवड्यांच्या आतील गर्भ सरकारी मान्यता असणाऱ्या ठराविक केंद्रांमध्येच प्रमाणित वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच करावा, असा शासनाचा कटाक्ष आहे.

१८ आठवड्यांच्या पुढील गर्भ असल्यास दोन प्रमाणित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या वैद्यकीय गर्भपातासाठी आवश्यक असतात.

स्त्री जर १८ पेक्षा कमी वयाची असेल अथवा ती मतिमंद असेल तर तिच्या आई-वडिलांची व ते नसल्यास अन्य पालकांची लेखी संमती वैद्यकीय गर्भपातासाठी आवश्यक असते.

आपण बघतो की बरेचदा गर्भपात गुपचूप करून घेतला जातो. काहीजण काही गावठी उपाय करण्याच्या फंदात पडतात. काहीवेळा कुठेतरी एखादया छोटया सेंटरमध्ये गर्भपात उरकला जातो. अशा ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर नसल्याने बाईच्या जीवाला धोका होऊ शकतो. वंध्यत्व येऊ शकते. गर्भपाताचे हे धोके टाळण्यासाठी आत सरकारने गर्भपाताचा कायदा केला आहे. पूर्वी गर्भपात करणे हा गुन्हा होता पण आता गर्भपाताला सरकारी मान्यता मिळालेली आहे. एवढंच नाही तर कोणत्याही सरकारी दवाखान्यात तो केला जातो. याबाबत चाललेले बेकायदा गर्भपात रोखून स्त्रियांच्या आरोग्याला होणारे धोके कमी करणे हाच मुख्य हेतू आहे.

स्त्रोत : गर्भपात, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट