आपण आपले घर, चावडी, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, कॉलेज, कार्यालये, यात्रेची ठिकाणे, लग्न समारंभ अशा ठिकाणी लोकांची गर्दी होते अशावेळी लोक वाटेल तिथे केरकचरा टाकून देतात. तसेच पिण्याचे पाणीही पिण्यायोग्य नसते. भांडी व्यवस्थित धुतलेली नसतात. अशा ठिकाणी विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच गावातून तरुण मंडळ, शाळा यापासून ग्रामसफाईचे तसेच संत गाडगेबाबा अभियानसारखे कार्यक्रम राबविले पाहिजेत. शुध्द हवा अलिकडच्या काळात कारखान्यांमुळे वातावरण खूप प्रदूषित होत आहे. त्यामुळे शुध्द हवा मिळत नाही. कारखान्याचा धूर हवेत मिसळतो. त्याबरोबर विषारी वायू मिसळतो. त्यामुळे श्वसनाचे, हृदयाचे आजार होतात. शुध्द हवा मिळण्यासाठी घराभोवती झाडे लावावीत की जेणेकरून आपल्याला शुध्द हवा मिळेल. त्यामुळे आपण आपले घर, परिसर, गाव, स्वच्छ ठेवले तर नक्कीच रोगराईपासून बचाव होऊ शकतो. आपल्याला चांगले जीवन जगता येईल. स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट