विहिरीद्वारे पाणी दुषित होण्याची कारणे विहिरीवर भांडी घासणे जनावरे धुणे लहान मुलांना शौचाला बसवणे कपडे धुणे सर्व आजूबाजूला दलदल असणेयाच पाण्याचा वापर पिण्याकरिता करणे. टॅकरद्वारे पाणी दूषित होण्याची कारणे ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. अशा गावांमध्ये टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अस्वच्छ पाणी जिथून उपलब्ध असेल तेथून भरून तो टॅकर गावात उभा केला जातो. अथवा विहिरीत, सोडला जातो. पाणी टंचाई असल्यामुळे लोक मिळेल ते पाणी घेऊन वापरतात. अतिशय अशुद्ध पाणी सुद्धा नाईलाजाने वापरावे लागते. नळाद्वारे पाणी दूषित होण्याची कारणे खाजगी पाईपलाईनमध्ये गळती असणे. नळ जोडणी खराब असणे. गटारातून पाईपलाईन जाणे. घरातील मोरीतून पाईपलाईन जाणे . नळाला तोट्या नसणे. नळाभोवती खडडे असणे. घरातील पाणी दूषित होण्याची कारणे पाण्याची भांडी उंचावर न ठेवल्यामुळे लहान मुले त्यामध्ये हात घालतात. पिण्याचे पाणी घेण्यासाठी ओघाराळे न वापरणे. पाणी झाकून न ठेवणे. खडडा करून त्यात रांजण ठेवणे त्यात पिण्याचे पाणी साठविणे. आहा रांजणाला बाहेरून शेवाळे येते व पाण्यातला घाण वास येतो व ते पाणी दूषित होते. शौचाहून आल्यावर हात साबणाने न धुणे. पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती पाणी नेहमी गाळून घ्या व उंचावर ठेवा, झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात शेवग्याच्या शेंगाच्या वाळलेल्या बिया टाकून ठेवल्या तर गाळ त्यात चिकटतो व खाली तळाशी बसतो पाणी उकळून घ्यावे. पाण्यावर तुरटी फिरवावी आणि गाळ बसण्यासाठी ठेवावे म्हणजे थोड्यावेळाने पाणी पिण्यास शुद्ध होते पाणी घेण्यासाठी ओगराळे वापरावे. स्त्रोत : सुरक्षित पिण्याचे पाणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट