1) सर्पदंश: काठी बांधून हालचाल होऊ न देणे, श्वसन थांबत असल्यास निओस्टिग्मीन + ऍट्रोपीन इंजेक्शन शिरेतून देणे. (2) विंचूदंश: दंशाच्या जागी पोटॅशियम परमँगनेट दाबणे व लिंबू पिळणे. तुरटी भाजून लावणे, लिग्नोकेन इंजेक्शन देणे. (3) जखमा: रक्तस्राव थांबवणे (दाब किंवा चिमटा), जखमा शिवणे, बांधणे. (4) अस्थिभंग : अस्थिभंग बांधून स्थिर करणे. 5) विद्युत धक्क्याने हृदयविकार झटका: कृत्रिम हृदयक्रिया (दाब देणे), कृत्रिम श्वसन (तोंडाने किंवा छातीवर दाब देऊन). 6) बुडणे: छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढणे, घशातून द्राव काढणे (सक्शन),कृत्रिम श्वसन व हृदयक्रिया. (7) पोटात विषारी पदार्थ जाणे: उलटी करवणे (मिठाचे पाणी पाजणे, घशात बोटे घालणे) कीटकनाशके असल्यास शिरेतून चार-पाच ऍट्रोपीन इंजेक्शने देणे. 8) शोष: (अतिसार), भाजणे, उष्माघात: जलसंजीवनी देणे, शिरेतून सलाईन देणे. (9) खूप ताप चढणे: कोमट पाण्याने अंग पुसून ताप उतरवणे. (10) बाळंतपण: नाळ बांधणे व कापणे, बाळाचा श्वसनमार्ग साफ करणे, रक्तस्राव आपोआप थांबत नसल्यास गर्भाशयचोळून, दाबून व मेथर्जिन इंजेक्शन देणे, स्वच्छ कपडा व हाताची मूठ वापरून गर्भाशय दाबणे व रक्तस्राव थांबवणे.गुदद्वारात प्रोस्टाग्लॅडिनची गोळी बसवून द्यावी. 11) कुत्रे चावणे: साबणाच्या पाण्याने जखमा धुऊन काढणे ही प्रथमोपचाराची अंगे आत्मसात करणे तसे सोपे आहे. पण मुख्य म्हणजे प्राथमिक आरोग्यकेंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात ती प्रत्यक्ष पाहणे व शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे तपशीलवार वर्णन इथे दिलेले नाही. विषबाधांचे निवडक प्रकार (तक्ता (Table) पहा) प्रथमोपचाराची आवश्यक तंत्रे (तक्ता (Table) पहा) लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine) संदर्भ : आरोग्यविद्या