मुडदूस ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये दिसणारा आजार म्हणजे मुडदूस होय. हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यामुळे हाडे ठिसूळ व मऊ बनतात. लक्षणे कपाळ पुढे आलेले दिसते. विकास हळूहळू होत असतो. सांध्यांच्या बाजूच्या हाडांची टोक फुगतात. सांधे सुजल्यासारखे दिसतात. छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो. पोट मोठे दिसते. टाळू नीट भरलेली दिसून येत नाही. उपचार बाळाला कोवळ्या उन्हात १०-१५ मिनिटे ठेवल्यास ‘ड’ जीवनसत्वाची गरज भागते. कारण त्वचा/कातडी सूर्यप्रकाशाच्या मदतीने ‘ड’ जीवनसत्व तयार करते. भरपूर दूध, माशाचे तेल, अंडी, मांस इत्यादी गोष्टी खाव्यात/खायला दयाव्यात. स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट