कांजण्या

कांजण्या हा लहान मुलांचाच आजार आहे. कांजण्याचे जंतू श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात. अंदाजे दोन आठवड्यानंतर रोगाची लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे

आजाराच्या सुरुवातीला थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. नंतर एक दोन दिवसांत अंगावर पुरळ येते. हे छाती पोट यावर जास्त दिसते. पुरळ सुरुवातीला लालसर असते. मग त्यात पाणी भरते. पू होतो आणि नंतर खपली धरते. हे सर्व पाच दिवसांत होते. हे पुरळ एका पाठोपाठ एक असे दोन तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर दिसते. खपली धरायला सुरुवात झाली की आजार संपत आला असे समजावे.

उपचार

प्रतिबंधक लस देता येते. परंतु ही लस सरकारी लसीकरणाच्या कार्यक्रमात मिळत नाही. ही खाजगी डॉक्टरकडून विकत घेऊन द्यावी लागते.

स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट