लहान मुलांमधील पोटदुखीसाठी उपाय

जुलाब होत असतील तर १ ग्लास स्वच्छ पाण्यात १ चमचा साखर आणि आणि चिमुटभर मीठ घालून हे पाणी सतत मुलांना पाजावे.

अपचन झाले असेल तर थोडया पुदिन्याच्या पानांचा रस काढून १ चमचा रस, तेवढेच मध आणि चिमुटभर काळे मीठ घालून दिवसातून ३ ते ४ वेळा चाटायला दया.

पोटात कळा येत असतील तर १ चमचा आल्याचा रस, १ चमचा मध आणि चिमुटभर मीठ घालून हे ३-४ वेळा चाटायला दया.

लहान बाळाचे पोट दुखत असेल आणि विव्हळून रडत असेल तर आईने ओवा खाऊन बाळाच्या पोटावर फुंकर मारावी किंवा कापडात ओवा घालून त्याची पोटली तव्यावर गरम करून पोट शेकावे.

पोटात जंत झाले असतील तर वावडिंग उकळवून पाणी दयावे किंवा वावडिंगाची पूड व गुळ एकत्र करून त्याच्या छोटया आकाराच्या गोळ्या करून दिवसातून ३ वेळा दयाव्यात. जंत पडून जातात.

जिरे व सैंधव मीठ समप्रमाणात एकत्र करून त्यात ते भिजेपर्यंत लिंबाचा रस घालून ७ दिवस काचेच्या बाटलीत भिजत ठेवावे. हे मिश्रण नंतर उन्हात वाळवून बाटलीत भरून ठेवावे. पोटदुखी, गासेससाठी हे उत्तम औषध आहे.

स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट