मानवी शरीराचे सामान्य तापमान ३७ अंश सेल्सियस किंवा ९८.६ अंश फॅरनहाईट असते. जर शरिराचे तापमान सामान्य पेक्षा जास्त असेल तर तो ताप असतो. ताप हा रोग नाही. ताप म्हणजे फक्त रोगाचे लक्षण आहे. ताप म्हणजे संक्रमणाची (इन्फेक्शन) शरिरावर होणारी प्रतिक्रिया आहे. ताप म्हणजे शरिरावर संक्रमणाचा होणारा परिणाम आहे. तापाचे वाढते तापमान रोगाच्या संक्रमणाची पातळी दर्शवितो.

ताप येण्याची कारणे
निम्नलिखित रोगांमुळे ताप येऊ शकतो.

मलेरिया

टायफाईड

क्षय रोग

हाडी ताप

डांग्या खोकला

गालफुगी

श्वसननलिकेचे संक्रमण जसे न्यूमोनिया आणि सर्दी, कफ, टॉन्सिल, दमा इ.

मूत्राशयाचे संक्रमण

तापाची सामान्य लक्षणे

शरिराचे तापमान ३७.५ से. किंवा १०० फे.किंवा त्यापेक्षा जास्त असणे

डोकेदुखी

थंडी वाजणे

सांधे दुखी

भुक न लागणे

जुलाब

भुक मंदावणे आणि थकवा

काही सामान्य उपाय

रोग्याला स्वच्छ व खेळत्या हवेच्या खोलीत झोपवावे.

त्याला जास्तीत जास्त तरल (पातळ) पदार्थ द्यावेत.

रोग्याला स्वच्छ आणि सैल कपडे घालावेत.

आराम करणे आवश्यक आहे.

शरिराचे तापमान जर ३९.५ से. किंवा १०३.० फॅ. पेक्षा जास्त असेल किंवा ४८ तासांपेक्षा जास्त वेळ ताप राहीला तर काळजी घ्यावी व वैद्यकिय सल्ला घ्यावा.

तापाच्या वेळी घेण्याचा आहार

जास्तीत जास्त प्रमाणात तरल पदार्थ किंवा उकळलेले पाणी प्यावे.

शरिराला आवश्यक असणारी उर्जा पुरविण्यासाठी ग्लुकोज, ताकद देणारी पेये किंवा फळांचा रस घ्यावा.

पचनास हलके असे पदार्थ घ्यावेत. उदा. तांदुळाची पेज, साबुदाण्याची खीर.

दुध, पोळी किंवा ब्रेड खावा.

अंडी, लोणी, दही खावे.

तळलेले पदार्थ टाळावेत.

स्त्रोत : आरोग्यविद्या