अतिसार म्हणजे काय अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. आंतड्यात द्रवपदार्थ अधिक प्रमाणात स्त्रवणे, आंतड्यात द्रव कमी प्रमाणात शोषून घेतले जाणे किंवा त्यातून मल हा वेगाने पुढे जाणे यामुळे अतिसार होतो. अतिसार हा पूर्णतः किंवा संदर्भानुसार वर्णन करता येतो. संपूर्ण अतिसार म्हणजे दिवसातून पाचपेक्षा अधिकवेळा शौचास लागणे किंवा पातळ होणे. संदर्भानुसार अतिसार म्हणजे दिवसातून शौचास जाण्याच्या संख्येत वाढ होणे किंवा त्या व्यक्तीच्या नेहमीच्या शौच सवयीच्या तुलनेत मल पातळ असणे. अतिसार प्रकार अतिसार हा एकतर तीव्र किंवा जीर्ण असतो, आणि प्रत्येकाची कारणे आणि उपचार वेगवेगळे असतात. अतिसाराच्या गुंतागुंतीमधे निर्जलीकरण, इलेक्ट्रोलाईट (खनिजं) कमी होणं आणि गुदव्दाराला खाज सुटण्याचा समावेश असतो. अतिसाराची प्रमुख कारणे आतड्यात जंतूंचा प्रादुर्भाव झाल्यास जसे अमिबा, जिआडिआ, तसेच इतर जंतूंच्या प्रादुर्भावामुळे अन्नातून विषबाधा झाली असल्यास त्याचबरोबर वातावरणातील बदल व जागरणे यामुळे अतिसार होण्याची शक्यता असते. अतिशय तेलकट व तिखट पदार्थांचे नियमित सेवन, हिवताप, एड्स व मोठ्या आतड्याचा कर्करोग इत्यादीसुद्धा अतिसाराची कारणे असू शकतात. लक्षणे अतिसाराची मुख्य लक्षणे म्हणजे वारंवार शौचास जावे लागणे शौचास पाण्यासारखे होणे, पोटाता गुबारा धरणे, मळमळणे, पोट फुगणे, पोटात कळ येऊन शौचास होणे. उपचार निर्जलीकरणावर तोंडावाटे पुनर्जलीकरण द्रावण आणि आवश्यक वाटल्यास, शिरेतून द्रव देऊन उपचार करता येतो. स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम