दुषित पाण्यामुळे उलटी व जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. यामुळे शरीर कोरडे पडू शकते. शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो.

प्रसार

दूषित पाण्यामुळे या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो. उदा. एकाच ओढयाचा कपडे धुणे, आंघोळ करणे, जनावरांना धुणे इ. साठी वापर केला तर, त्याचप्रमाणे उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने, पाणी न गाळता, न उकळता, तसेच न झाकलेले पाणी पिणे म्हणजेच स्वच्छतेचा अभाव, असल्यामुळे गॅस्ट्रोची लग्न व प्रसार होतो.

लक्षणे

पोट दुखणे व वारंवार पातळ संडास होणे.

उलटी होणे. लहान मुलांची टाळू खोल जाने, डोळे खोल जाणे.

तोंड कोरडे पडणे वजनात घट होणे.

लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.

उपाय योजना

पाणी उकळून व गाळून पिणे.

घराच्या परिसरातील स्वच्छता राखणे.

शौचाला जावून आल्यानंतर हात साबणाने धुणे.

जलसंजीवनी देणे. याने फरक न पडल्यास दवाखान्यात दाखवावे.

इतर उपाय योजना

गावातील पाणीपुरवठा योजनेची नियमित पाहणी करणे.

गावातील मुख्य टाकी नियमित धुवून स्वच्छ करणे.

मुख्य पाईपलाईन ते टाकीपर्यंत पाईपलाईन मध्ये गळती आहे का ते पाहणे.

टाकीवर नेहमी झाकण आहे का ते पहावे.

पाण्याच्या टाकीचा परिसर स्वच्छ असावा.

शक्यतो हातपंपाचे पाणी, पायऱ्या नसणाऱ्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरावे किंवा सार्वजनिक विहिरीत टी.सी.एल. टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरावे. परंतु तिथे दररोज घाण होणार नाही याची काळजी घ्यावी.

स्त्रोत : सुरक्षित पिण्याचे पाणी, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट