त्वचेवर निरनिराळया कारणांमुळे लहानमोठे पुरळ येते. काही पुरळ नुसते पुवाने भरलेले असतात तर काही पातळ द्रवपदार्थाने. बहुतेक वेळा पुरळाबरोबर ताप येतो. पुरळाची कारणे खालीलप्रमाणे

कांजिण्या (पूर्वी देवीनेही याचसारखे पुरळ यायचे)
गोवराचा आजार

नागीण (या आजारात अंगावर एका रेषेत पुरळ येतात)

वावडे किंवा ऍलर्जी
त्वचेचा जंतुदोष
एड्स चा आजार

रोगनिदान

प्रत्येक आजारात पुरळाचा प्रकार वेगवेगळा असतो.

पुरळाबरोबर खाज सुटत असेल तर बहुधा वावडे (ऍलर्जी) हेच कारण असते.

गोवराचे पुरळ तापाच्या तिस-या-चौथ्या दिवशी येतात. याचे पुरळ लालसर,मोहोरीइतके व शरीरभर सगळीकडे असतात. त्यात पाणी, पू काही नसते. आठवडाभरात हे पुरळ नाहीसे होतात.

कांजिण्याचे पुरळ दोन-तीन दिवसांत पुवाने भरतात व नवीन पुरळ एकामागोमाग येत राहतात.

उपचार

पुरळावर उपचार म्हणजे मूळच्या आजारावर उपचार. वावडे किंवा ऍलर्जी असेल तर कोठल्या पदार्थामुळे वावडे आले आहे हे कळले तर जास्त उपयोग होतो. वावडयाचे पुरळ व खाज सीपीएम गोळीने कमी होते. त्वचेचा जंतुदोष असल्यास जंतुविरोधी औषधे (कोझाल) वापरावीत.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या