त्वचेवर कोरडेपणा, खवले, खाज, पुरळ, पाणी येणे, इत्यादी त्रासाला इसब म्हटले जाते. बहुतेक वेळा इसब काही गोष्टींच्या वावडयामुळे होते.

इसब कशामुळे होतो ?

इसब हा सामान्यतः एखादी अतिसंवेदनशीलता किंवा अलर्जी जिच्यामुळे दाह होतो त्याच्या परिणामी होतो. दाहामुळे त्वचा ही लाल, खाजणारी आणि खवलेयुक्त होते.

इसबाची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?

इसबामुळे त्वचा लाल होते, कोरडी पडते आणि तिच्यावर लाल चट्टे उठतात. उष्णता, तणाव, किंवा खाजवण्यामुळं जखमा झाल्यानं तिथला कंड अधिक वाढतो.

कोणत्या वयोगटातील लोकांना इसब अधिक प्रमाणात होतो ?

लहान बाळं आणि युवा मुलांमधे ते सहसा आढळते. तथापि, वयस्कर मुले आणि प्रौढांनादेखील इसबचा त्रास होऊ शकतो.

त्वचेवर चट्टे उठण्याचे सर्वात सामान्य ठिकाण कोणते ?

गुडघ्यांच्या मागे, कोपरांचा कोन आणि मनगटे, मानेवर, घोट्यांवर आणि पायांवर ब-याचदा चट्टे उठतात. बालकांमधे हे चट्टे गालांवर पुरळ येण्याव्दारे सुरु झाल्याचे दिसून येते. काही महिन्यांनी हे पुरळ हात आणि पायांवर उठतात.

अशी स्थिती सर्वात अधिक कोणाला होऊ शकते ?

दमा किवा उच्च ताप येण्याचा इतिहास असलेल्या लोकांमधे इसब हे अधिक सहजपणे आढळते. इसबाचा कौटुंबिक इतिहास, पिवळा ताप किंवा अन्य श्वसनाच्या अलर्जी असणा-या लोकांमधे देखील इसबाचे प्रमाण अधिक असते.

याचे काही कारक घटक आहेत काय ?

इसब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, ते व्यक्तीनुसार बदलू शकतेः

वातावरणातील घटकांचा प्रादुर्भाव (साबण, डीटरजन्टस्, क्लोरीन, आणि इतर त्रासकारक पदार्थ).

काही अन्नपदार्थ लक्षणांना आणखी तीव्र करु शकतात (दूध, अंडी).

तणाव हा देखील एक घटक आहे.

कोरडे हवामान आणि कोरडी त्वचा हे सुध्दा त्याला आणखी तीव्र करण्यास कारणीभूत ठरतात.

ही स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वसाधारण कोणत्या शिफारशी उपयुक्त ठरतात ?

वर नमूद केलेले कारक घटक टाळण्याव्दारे लक्षणांची तीव्रता कमी करता येते.

या स्थितीचे दीर्घकालीन परिणाम कोणते होतात ?

संक्रमण

चट्टा पडणे

दाहपश्चात् हायपोपिगमेंटेशन

यावरील उपचारांचे दुष्प्रभाव कोणते आहेत ?

टॉपिकल स्टेरॉईड मलमांमुळे त्वचेची खाज आणखी वाढू शकते किंवा त्वचेची दुय्यम स्थिती निर्माण होऊ शकते. कालांतराने त्यांच्यामुळे त्वचा पातळ होऊ शकते. प्रतिजैविकांमुळे ते कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार अनेक विविध दुष्प्रभाव होऊ शकतात. अन्टीहीस्टमाईन्समुळे थकवा येऊ शकतो.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम