किशोरवयीन मुला-मुलीनी वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवावी मुलींसाठी जननेंद्रियाची स्वच्छता ठेवावी. घरातील बायकांनी एकमेकीचे पाळीचे कपडे न वापरणे . मासिक पाळीचे कपडे साबणाने स्वच्छ धुवून उन्हात वाळत टाकावेत. मासिक पाळीच्या वेळी रोज आंघोळ करावी. आन्घीलीच्या वेळी मायांग सुद्धा स्वच्छ धुवावे. मायांग स्वच्छ कपड्याने व्यवस्थित कोरडे करावे. पाळीचे घ्यायचे कपडे दिवसातून २-३ वेळा तरी बदलावेत. संडासला जाऊन आल्यानंतर जागा पुढून मागे धुवावी. मायांगाचा बाहेरील भाग स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास पाळी पूर्ण बंद झाल्यानंतर सर्व कपडे स्वच्छ धुवून डेटोलच्या पाण्यात भिजत ठेवून स्वच्छ कडक उन्हात वाळवून पुढच्या वेळी वापरण्याकरिता घडया करून ठेवाव्यात. मुलांनी जनेन्द्रीयांची कशी घ्यावी? मुलांनी त्यांची जननेंद्रिये रोज स्वच्छ धुतली पाहिजेत. या शिश्न, संडासची जागा, जांघेवरचे केस इत्यादी साबणाने धुतले पाहिजे. लघवी नंतर शूचा शेवटचा थेंब सुद्धा पडू दयावा. संडासची जागा सुद्धा पाण्याने स्वच्छ धुवावी. लघवी नंतर व संडासहून आल्यावर हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत. घट्ट असलेले आतले कपडे आणि प्यान्ट सुद्धा वापरू नये. जर कपडे ओले झाले असतील ते ते बदलावेत. एकमेकांचे टॉवेल/ अंगपुसणे सुद्धा वापरू नये. शिश्नाच्या टोकाची त्वचा व जवळपासचा भाग सुद्धा स्वच्छ पाण्याने रोज स्वच्छ धुवावा. स्वच्छ धुतलेले आतले कपडेच वापरावेत. आतले कपडे पण सैलसर असावेत. स्त्रोत : वयात येताना (किशोरावस्था), माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट